हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
उदगीर : उदगीर व तालुक्यातील ग्रामीण कुस्ती या खेळाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. या खेळाला देशपातळीवर व राज्य पातळीवर रुस्तम ए हिंद स्व. पै. हरिश्चंद्र बिराजदार, काकासाहेब पवार यासारख्या कुस्तीपटूंनी लातूर जिल्ह्याचे नाव राज्य व देश पातळीवर नेऊन पोहोचविले असल्याचे गौरवोद्गार राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांनी काढले.
उदगीर येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे शनिवारपासून आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसात पार पडलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै.संदीप भोंडवे, उपाध्यक्ष पै.विलास कथुरे, कुस्ती मल्लसम्राट पै.अस्लम काझी, तहसीलदार राम बोरगावकर, बालाजी भोसले, वसंत पाटील, सय्यद जानीमियाँ, अभिजीत औटे, दिपाली औटे, वर्षा मुस्कावाड, शाम डावळे, क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदीसह पैहलवान आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते
यावेळी बोलताना ना. बनसोडे म्हणाले की, राज्यपातळीवर कुस्तीपटूंचा थरार उदगीर व परिसरातील नागरिकांना अनुभवता यावी याकरिता राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धाचे आयोजन केले आहे. अतिशय सुंदर नियोजन आयोजन समितीच्या पदाधिकारी यांनी केले असून उदगीरकरांनी ही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे ना. बनसोडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शोभा कुलकर्णी पुणे यांनी केले.
या स्पर्धेत 57 किलो वजन गटात रणजित पाटील कोल्हापूर (प्रथम), आकाश गड्डे लातूर (द्वितीय), ओम वाघ अहमदनगर व निनाद बडरे सांगली (तृतीय), 70 किलो वजन गटात निखिल कदम पुणे (प्रथम), निलेश हिरुगडे कोल्हापूर(द्वितीय), अनुप पाटील कोल्हापूर व ओंकार फडतरे सातारा (तृतीय), 97 किलो वजन गटात साकेत यादव पुणे (प्रथम), शशिकांत बोगारडे कोल्हापूर (द्वितीय), लक्ष्मण पाटील सोलापूर व अजय थोरात सातारा (तृतीय), 55 किलो वजन गटात वैभव पाटील कोल्हापूर (प्रथम), संकेत पाटील कोल्हापूर (द्वितीय), ओंकार रोडगे व स्वप्नील भिंगारे सोलापूर (तृतीय). 77 किलो वजन गटात नितीन कांबळे कोल्हापूर (प्रथम), सुशांत पालवे सोलापूर (द्वितीय), विष्णू तातपुरे लातूर व विश्वजित पाटील कोल्हापूर (तृतीय), 130 किलो वजन गटात दिग्विजय भोंडवे पुणे (प्रथम), प्रतीक देशमुख पुणे (द्वितीय), अक्षय शेळके लातूर व भूषण पवार सांगली (तृतीय). महिलांच्या 50 किलो वजन गटात ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे (प्रथम), आर्या पाटील कोल्हापूर (द्वितीय) व प्रमिला पवार कोल्हापूर (तृतीय), 59 वजन गटात कल्याणी गादेकर पुणे (प्रथम), आकांक्षा नलावडे पुणे (द्वितीय), सृष्टी भोसले कोल्हापूर (तृतीय) व महिला 76 किलो वजन गटात प्रतिक्षा बागडी सांगली (प्रथम), वेदीका ससाणे कोल्हापूर (द्वितीय) व सिद्धी शिंदे पुणे (तृतीय). यांचा समावेश आहे. सर्व विजेत्यांना क्रिडामंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले. आज सोमवारी कुस्ती स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे.