सुधाकर श्रृंगारेच्या विजयासाठी भाजपा युवा मोर्चा सज्ज: जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे.

 सुधाकर श्रृंगारेच्या विजयासाठी भाजपा युवा मोर्चा सज्ज: जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे.                                   

लातूर लोकसभा भाजपाचे लोकप्रिय उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या विजयाचा संकल्पपूर्वक निर्धार युवा मोर्चाने केलेला असून येत्या काळात भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते जीवाचं रान करून उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आणून भाजपच्या विजयाची हॅटट्रिक करतील असा विजयीसंकल्प भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे यांनी व्यक्त केला आहे.   
                              देशाचे लोकप्रिय व कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संबंध देशात विकासाचा रथ सर्व क्षेञात घौडदौड करत आहे.मागील दहा वर्षांत देशासमोरील अनेक प्रश्न निर्धार पूर्वक सोडविले आहेत.दारिद्र् निर्मुलन,उज्वला गॅस योजनेतून गॅस वितरण,आत्मनिर्भर भारत या माध्यमातून बेरोजगारांना कौशल्य शिबीर घेऊन रोजगार उपलब्धी, राष्ट्रीय महामार्गाचे संपूर्ण देशभर जाळं याशिवाय अनेक ण् क्रांतिकारी धोरणं आखून देश पुढे नेण्याचा प्रयत्न केला.एवढ्यावर न थांबता अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला काश्मीर प्रश्न तीनशे सत्तरावं कलम रद्द करून काश्मीरला राष्ट्र विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.सगळ्यांच्या आस्थेचा व जिव्हाळ्याचा राम मंदिराचा प्रश्र्न राम मंदिर निर्माण करून मिटवला. अशा त्यांच्या नेतृत्वाला बळकटी येण्यासाठी पुढील काळात'अबकी बार चारशो पार'हा संकल्प मनी ठेवून आम्ही सगळे युवा मोर्चाचे कार्यकर्ते ,पदाधिकारी अहोरात्र मेहनत करून सुधाकर श्रृंगारे यांच्या विजयाच्या गुलाल उधळण्यासाठी सज्ज झालो आहोत.अशा प्रकारचा दृढनिश्चय अमोल निडवदे यांनी व्यक्त केला.

Popular posts
संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 14 जूनला उदगीरात आयटीआय प्रवेश मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
श्रमदानाने महिलांनी केला जागतिक महिला दिन साजरा : ग्रीन आर्मीचा पुढाकार उदगीर : वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करीत पर्यावरणाची जपणूक करण्याच्या कामात सतत अग्रेसर असलेल्या ग्रीन आर्मी या संघटनेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी श्रमदान करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. देगलूर रोडवरील पाटबंधारे कार्यालयाच्या परिसरात ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा संकल्पही या निमित्ताने करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी भारत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रीन आर्मीच्या वतीने गत जून महिन्यात या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली होती. यातील बरीच झाडे जगली असून त्यांच्या संवर्धनासाठी आज महिलांनी श्रमदान करीत झाडांना पाणी घातले. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानीही या श्रमदांनात सहभाग नोंदविला. या ऑक्सिजन पार्कसाठी रश्मी सूर्यवंशी यांनी दहा झाडे भेट देवून ती जगविण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमासाठी ग्रीन आर्मीच्या अध्यक्षा अरुणा भिकाने, अर्चना नळगीरकर,अनिता यलमटे, शोभाताई कोटलवार, सरिता खोडे, रश्मी सूर्यवंशी, साधना रायवाड, वर्षा कोटलवार आदींनी पुढाकार घेतला. डॉ. अनिल भिकाने, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, गोपालकृष्ण नळगीरकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, पत्रकार विक्रम हलकीकर, ऍड. निशांत धवलशंख यांच्यासह पाटबंधारे विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Image
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image