मंत्री ना.बनसोडे यांच्या सुरेख नियोजनात स्पर्धा यशस्वी : रेश्मा डफळ

मंत्री ना.बनसोडे यांच्या सुरेख नियोजनात स्पर्धा यशस्वी : रेश्मा डफळ




उदगीर सारख्या ग्रामीण भागात झालेल्या राज्यस्तरीय स्व. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धामुळे ग्रामीण भागातील खेळाडूना प्रोत्साहन मिळाले असून या स्पर्धेसाठी राज्याचे क्रीडा मंत्री ना. संजय बनसोडे यांनी केलेले सुरेख नियोजन यामुळे या स्पर्धा यशस्वी झाली असल्याची प्रतिक्रिया कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेल्या सातारा येथील रेश्मा डफळ या महिला कुस्तीपटूनी व्यक्त केली. आपण पोलीस खात्यात नोकरी करीत असून घर व नोकरी करीत असताना कुस्तीचा सराव करणे शक्य होत नाही. पण आवड असल्याने आपण या स्पर्धेत सहभागी झाले असल्याचे सांगून रेश्मा डफळ यांनी भव्य दिव्य पार पडलेल्या या स्पर्धा पारदर्शक पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आयोजकांनी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय झाली असल्याचेही त्या म्हणाल्या. मला स्व. खाशाबा जाधव यांच्या नावाने पुरस्कार मिळाला आहे. आज त्यांच्याच नावाने आयोजित कुस्ती स्पर्धेत मला सहभागी होता आले हे माझं सोभाग्यच आहे अशी प्रतिक्रियाही यावेळी रेश्मा डफळ यांनी दिली.

-----------------------------------------------------

शैलेश शेळके टाका ता.औसा उपमहाराष्ट्र केसरी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, स्व. खाशाबा जाधव यांच्या नावाने

आजपर्यंत इतकी मोठी स्पर्धा आपण कधीही पाहिली नसल्याचे सांगितले.

राज्याचे क्रीडा मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या प्रयत्नामुळे ही स्पर्धा उदगीर येथे होत असून ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या मुलांना कुस्तीकडे वळवावे असे आवाहन केले. स्व. पै. हरिश्चंद्र बिराजदार पै. काकासाहेब पवार यांनी लातूर जिल्ह्याला कुस्तीचा समृद्ध वारसा दिलेला आहे. त्यांचा वारसा पुढे टिकवून ठेवण्यासाठी या भागातील कुस्तीपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या भागाचे नाव उज्वल करावे असे आवाहनही यावेळी उपमहाराष्ट्र केसरी असलेल्या शैलेश शेळके यांनी केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज