राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी इम्तियाज शेख यांची निवड

 राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी इम्तियाज शेख यांची निवड



उदगीर [ प्रतिनिधी ]  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री  ना. संजय बनसोडे , अहमदपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार  बाबासाहेब पाटील, छ. संभाजी नगर शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रमजी काळे,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व्यंकट बेद्रे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष अफसर बाबा शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष पंडीतराव धुमाळ यांच्या शिफारसी नुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी उदगीर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते  इम्तियाज शेख यांची नियुक्ती केली आहे. त्यांना मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री  ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आदी उपस्थित होते . यांच्या या निवडी बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष समीर शेख, जिल्हा नियोजन समिती चे सदस्य प्रा श्याम डावळे, विधानसभा अध्यक्ष प्रा प्रवीण भोळे,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रदीप जोंधळे, राकाँपा सांस्कृतिक विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष अभिजीत औटे, राकॉपाचे अल्पसंख्यांक विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष शफी हाशमी आदीनी अभिनंदन केले आहे.

Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही