हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा

हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा


दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
उदगीर : कर्नाटक व तेलंगाना सीमाभागातील उदगीर हे उद्योग, व्यापार व व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र आहे. उदगीर येथून जोडणारा जुना रेल्वे मार्ग आहे. मात्र रेल्वे सेवेपासून नेहमीच वंचित राहिलेला आहे. गुरुवारी (दि. १४) दक्षिण मध्य रेल्वेचे सिकंदराबाद येथील महाव्यवस्थापक अरुण कुमार जैन आणि विभागीय व्यवस्थापक भरतेश कुमार जैन हे उदगीर दौऱ्यावर आले होते. यावेळी उदगीरकरांनी हैदराबाद-बिदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा, बिदर-मुंबई एक्सप्रेस दररोज करा अशा अनेक मागण्या केल्या आहेत.


दक्षिण रेल्वेचे महाव्यवस्थापक व विभागीय व्यवस्थापक गुरुवारी उदगीर रेल्वे स्थानकात पाहणीसाठी आले होते. यावेळी उदगीरच्या शिष्टमंडळाने या दोन्ही वरिष्ठ

अधिकाऱ्यांची भेट घेऊन अनेक मागण्या केलेल्या आहेत. उदगीर येथील व्यापाऱ्यांचा हैदराबादची दैनंदिन संबंध आहे. त्यामुळे हैदराबाद-बिदर इंटरसिटी रेल्वे पुढे उदगीरपर्यंत वाढविण्यात यावी. तसेच बिदर ते मुंबई एक्सप्रेस रेल्वे दररोज नियमित करण्यात यावी, काझीपेठ ते हडपसर मुंबईपर्यंत वाढवून दररोज नियमित करावी मछलीपटनम ते बिदर रेल्वे परळीपर्यंत वाढविण्यात यावी याशिवाय उदगीर रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, प्लॅटफॉर्म दोनवर शेड तयार करण्यात यावे आदी मागण्या दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व विभागीय व्यवस्थापक यांच्याकडे करण्यात आले. यावेळी दक्षिण मध्य रेल्वेचे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य मोतीलाल डोईजोडे, बसवराज रोडगे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, ज्येष्ठ समाजसेवक रमेश अंबरखाने, डॉ. आर. एन. लखोटीया, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, विजयकुमार पारसेवार, लहू हुरुसनाले, प्रशांत मंगुळकर, रामेश्वर पवार, नारायण वाकुडे, उमाकांत वडजे, आदी उपस्थित होते.

Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
Image