उदगीरात महिला बचत गटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबीर संपन्न नगर परिषदेच्या उपक्रम: जागतिक महिला दिनाचे औचित्य

  उदगीरात महिला बचत गटातील सदस्यांचे   आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबीर संपन्न

नगर परिषदेच्या उपक्रम: जागतिक महिला दिनाचे औचित्य


उदगीर : येथील नगर परिषदेच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिना निमित्त महिला बचतगटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण संपन्न झाले.

प्रशिक्षणाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. मुख्याधिकारी यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिना निमित्त उदगीर नगरपरिषद कार्यलयातील सर्व महिला अधिकारी कर्मचारी, प्रातिनिधिक महिला सफाई मित्र यांचा सन्मान करण्यात आला.


उपस्थित महिला बचतगटातील सदस्यांना मार्गदर्शन करतांना लक्ष्मण सरंबळकर, प्रबंधक भारतीय स्टेट बँक मुख्य शाखा उदगीर यांनी महिला बचत गातील सदस्यांना बँकेच्या योजनाचा लाभ घेण्याबद्दल आवाहन करत त्यांनी सुकन्या योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,  प्रधानमंत्री सुरक्षा विमा, वैयक्तिक अपघात विमा, कर्ज प्रस्ताव परिपूर्ण, कर्ज विहित वेळेत परत फेड या विषयी सविस्तर माहिती दिली. 


युवराज खेडकर, शाखा व्यवस्थापक  यांनी महिला बचतगटाची पंचसूत्री, फिरता निधी, बँक कर्ज प्रस्ताव परिपूर्ण कसा असावा, बँक महिला बचत गटांना बचतीच्या सहा पट कर्ज देते, नियमित परत फेड यासह सर्व सदस्यांनी स्वत: व कुटुंबातील सदस्यांचा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,  प्रधानमंत्री सुरक्षा विमा या कमी कमी रक्कम असलेल्या विमा योजनाचा लाभ घ्यावा.


डॉ.माधवी जाधव, स्त्री रोग तज्ञ, उपजिल्हा रुग्णालय उदगीर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना महिलांनीच आपले आरोग्य जपावे, महिला या यशोमती आहेत, महिलांनी स्वत: आणि कुटुंबातील सदस्यासाठी सकस व सर्व प्रकारचे व्हिटामिन व घटक असणारे अन्न बनवावे. जेवताना ताट हे पूर्ण भरलेले असावे ज्यात भाकरी, चपाती, दही, लिंबू, पाले भाज्या, डाळी, मोड आलेले कडधान्य या सर्वांचा सहभाग असावा. आरोग्य सुदृढ राहावे यासाठी चालणे, सायकलिंग, पोहणे, प्राणायाम योगासने इ. व्यायाम आवश्यक आहे. वेळेचा सदुपयोगकरावा, मोबाईलचा अति वापर टाळावा, महिलांनी मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.           


उपस्थित महिलांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे यासाठी बचत गटाच्या माध्यमातून झालेले स्व: परिवर्तन यशोगाथा एनयुएलएम सीआरपी अनिता चौधरी व उमेद अभियानाच्या सीआरपी गोदावरी शिंदे यांनी आपला गटात येण्यापूर्वी पासून ते आज तागायत झालेला विकासात्मक वास्तव बदल चित्र मांडले.    


कार्यक्रमास उपमुख्याधिकारी सतीश बिलापट, महेश शिंदे, न.प. कार्यालयातील सर्व महिला अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी केले तर आभार विशाल गुडसूरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी समुदाय संसाधन व्यक्ती अनिता चौधरी, शिल्पा काळे, सुवर्णा धुळेकर, स्मिता ठाकूर यांनी मेहनत घेतली.


Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
Image