*खेळाडूंनी खाशाबा जाधव यांचे स्वप्न पूर्ण करावे : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे*
*उदगीर शहरात अद्यावत क्रीडा संकुल उभारणार*
*उदगीर* : जागतिक ऑलम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचे स्व. खाशाबा जाधव यांचे स्वप्न होते, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यातील खेळाडूंनी प्रयत्न करावेत असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
उदगीर येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उदघाटन ना. बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आ.गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, बसवराज पाटील नागराळकर, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर - घुगे, पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, व्यंकटराव बेद्रे, रमेश अंबरखाने, मल्लिकार्जुन मानकरी, गुलाब पटवारी, तीन वेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारे उपविभागीय पोलीस विजय चौधरी, बापू लोखंडे, नामदेव कदम, प्रसिध्द मल्ल असलम काही, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, मुख्याधिकारी सुंदर बोंदर, बालाजी भोसले पाटील, भाजपचे नेते सुधीर भोसले, माजी नगरसेवक ऍड. दत्ताजी पाटील, वसंत पाटील, सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे , संग्राम हासुळे पाटील, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी गोवा येथे मागच्या काळात पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला 228 पदके मिळाली असल्याची माहिती देऊन राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून ही पदके स्वीकारताना आपल्याला विशेष अभिमान असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले. कुस्ती हा खेळ मराठवाड्यात लोकप्रिय असून लातूर जिल्ह्याला देखील कुस्तीचा समृद्ध असा वारसा आहे. तो वारसा पुढे नेण्यासाठी जिल्ह्यातील कुस्तीपटूंना प्रेरणा म्हणून यासाठी उदगीर येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले असल्याचेही यावेळी ना. बनसोडे यांनी सांगितले.
उदगीरसह ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरातील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर 14 कोटी रुपये खर्च करून भव्य दिव्य क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त तोंडार येथील कारखान्याजवळ गायरान जमिनीवर जवळपास 82 कोटी रुपये खर्च करून भव्यदिव्य असे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्याचा माझा मानस आहे. या कामाचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री ना. संजय बनसोडे यांनी दिली.
अवघ्या चार दिवसात भव्य दिव्य अशा राज्यस्तरीय कुस्तीस्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल आयोजन समितीच्या पदाधिकारी यांचे ना. बनसोडे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याचे क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या अभिनेत्री शेफाली जरीवाला यांनी काटा लगा, झिंगाट व अन्य गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला.
यावेळी लेझर शो च्या माध्यमातून कुस्तीचा इतिहास व खाशाबा जाधव यांच्या कार्याची माहीती दाखविण्यात आली. त्यानंतर व फायर शो करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
: या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना ही स्पर्धा सुलभतेने पाहता यावी याकरिता तब्बल 4000 प्रेक्षक बसतील अशी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षकांना चालू असलेल्या स्पर्धा पाहण्यासाठी सहा मोठ्या स्क्रिनची सोयदेखील करण्यात आल्याने प्रेक्षकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा