संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 14 जूनला उदगीरात आयटीआय प्रवेश मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 14 जूनला उदगीरात आयटीआय प्रवेश मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

उदगीर : दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी हरंगुळ ता. लातूर येथील      संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने उदगीर येथील राजीव गांधी तंत्र निकेतन च्या परिसरात दिव्यांग बांधवांसाठी आय टी आय प्रवेश मार्गदर्शन मेळावा,  प्रवेश नोंदणी व प्रवेश अर्ज निश्चितिकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या शुक्रवारी दि. 14 जून रोजी सकाळी 10 वाजता हा मेळावा सुरू होणार असून या मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी बस स्थानक परिसरातून ने आण करण्यासाठी निशुल्क वाहनांची सोय करण्यात आली आहे. या मेळाव्यात उपस्थित राहू इच्छिनाऱ्यानी येताना दहावीचे गुणपत्र, टी. सी., दिव्यांग प्रमाणपत्र, जातीचा दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखल, नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, डोमीसाईल प्रमाणपत्र, आधार कार्ड, मोबाईल नंबर, इमेल आय डी, पासपोर्ट साईज दोन फोटो, घेऊन यावेत असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी नोंदणी शुल्क 150 तर मागासवर्गीय संवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी श्री मगर 8237320849, श्री. दंडे सर 9764427375 व श्री. पैके सर – 9075306299, श्री. स्वामी सर – 9767615918, व श्री. पंडीत सर - 9168989517  यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य, संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था हरंगुळ ता. जि. लातूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.


टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज