भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उदगीर शहराध्यक्षपदी सरोजा वारकरे
उदगीर : भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्याच्या उदगीर शहराध्यक्षपदी भाजपा च्या ज्येष्ठ नेत्या सरोजा वारकरे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले यांच्या हस्ते वारकरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, महिला मोर्च्या जिल्हा अध्यक्ष उत्तरा कलबुर्गे, माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, ज्येष्ठ नेते धर्मपाल नादरगे, माजी नगरसेवक बापूराव येलमटे मामा, ऍड. दत्ताजी पाटील, शहर सरचिटणीस आनंद बुंदे, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा उषा माने, जिल्हा सरचिटणीस जया काबरा, सोमनाथपूर ग्राम पंचायत सदस्या शिवकर्णा अंधारे, जिल्हा उपाध्यक्ष श्यामल कारामुंगे, रेणुका डुबूकवाड,महिला जिल्हा सरचिटणीस मंदाकिनी जिवणे, जिल्हा सचिव स्वाती वट्टमवार, सुनीता स्वामी,शहर सरचिटणीस शिवगंगा बिरादार, प्रशांत रंगवाळ आदींसह पदाधिकारी , महिला कार्यकर्ते उपस्थित होते.