गणेश मंडळांनी गरजूवंताचा आधार व्हावे - स्वप्निल जाधव
लातूर (प्रतिनिधी)
राष्ट्रीय एकतेचे प्रतीक असलेला आपला गणेशोत्सव सार्वजनिक गणेश मंडळासह प्रत्येकाच्या घरी साजरा होत आहे. हा उत्सव इतिहासाचे ज्ञान,वर्तमानाचे भान,भविष्याचा वेध घेणारा व निरर्थक खर्च टाळत गरजूवंताना साडी वाटप करण्यात आले.
सोमनाथपूरचे ग्रामपंचायत सदस्य शिवकर्ण अंधारे, सीमाताई सूर्यवंशी,नंदा सचिन पवार, पल्लवी व्यंकटेश वाघमारे, प्रियंका उमाकांत पवार,निशा अनिल पवार,छाया संजय राठोड,सवित्रा शिवाजी पवार, अश्विनी शिवाजी पवार,कावेरी वसंत कांबळे,सुनंदा सुधार सोनकांबळे,छाया वसंत जाधव यांच्या उपस्थितीत सोमनाथ पूर गावात प्रथमच खास महिला व मुलींसाठी 'सब गेलो सब जियो' या खेळाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये संगीत खुर्ची, लिंबू चमचा,डान्स, रांगोळी,असे अनेक प्रकारचे खेळ घेण्यात आले.
सामाजिक उपक्रमातून मदत होईल असा सामाजिक उत्तरदायित्व निभावणारा सर्व गणेश मंडळांनी व सजग युवा वर्गांनी साजरा करावा असे आवाहन गणेशउत्सवानिमित्त स्वप्निल जाधव यांनी सर्वांना केले आहे.
परिस्थितीचे आत्मभान जागे ठेवत आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, क्रीडा, पर्यावरण, उद्योग, रोजगार, निसर्गात भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय व मार्गदर्शन, प्रदुषण,मदत, ,तंत्रज्ञान,सलोखा, व्याख्याने, रक्तदान शिबीरे,या पर्यावरणीय दृष्टिकोनातून पर्यावरण संवर्धन - संरक्षण विषयी जनजागृती करत विधायक कामाने गरजवंताचा मदतरुपी आधार बनत गणेश उत्सव पर्यावरण पुरक, पर्यावरण स्नेही,आदर्श गणेशोत्सव साजरा करावा. आपणही या समाजाचे देणे लागतो,या उद्देशाने कार्य करून निराधार - वंचितांना मदत करत,नवा आदर्श समाजापुढे ठेवून समाज हीत लक्षात घेत एक मदत समाजासाठी,गरजवंताच्या सर्वांगीण विकासासाठी आसावी म्हणून कार्य करावे गणेश उत्सव कसा आदर्श असावा याचे उत्तम उदाहरण सर्वांसमोर गणेश मंडळाने दाखवावे काही मंडळे विविध सामाजिक स्तुत्य उपक्रम प्रभावीपणे राबवितात याला चालना मिळेल आज गरजेचे आहे.विविध सामाजिक उपक्रमातून गणेशोत्सवाचा मूळ हेतू लक्षात घेत नियोजन करून सेवा करने आवश्यक असून भविष्यासाठी लाभदायक ठरणारे असून, यामुळे राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल असे आवाहन हि स्वप्निल जाधव त्यांनी यावेळी केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा