'उदगीरची दूध डेअरी झालीच पाहिजे' ही घोषणा देत उदगीरात दूध डेअरी बचाव साठी धरणे आंदोलन

'उदगीरची दूध डेअरी झालीच पाहिजे' ही घोषणा देत उदगीरात दूध डेअरी बचाव साठी धरणे आंदोलन



उदगीर ( विक्रम हलकीकर) :  येथील शासकीय दूध योजनेचा प्रकल्प भंगारात काढल्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ उदगीर येथील शासकीय दुध डेअरी पुनरुज्जीवन समितीच्या वतीने दूध डेअरी च्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी उदगीरची दुध डेअरी झालीच पाहिजे अशा घोषणा देत शासनाच्या निर्णयाचा निषेध केला.

उदगीर सह सीमा भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणणारा प्रकल्प म्हणून उदगीरच्या शासकीय दूध योजना प्रकल्पाकडे पाहिले जाते. मात्र हा प्रकल्प गेल्या काही दिवसापासून बंद पडल्यामुळे शासनाने हा  प्रकल्प भंगार मध्ये विक्री काढण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने हालचाली करून  वृत्तपत्रातून निविदा काढत एका खाजगी कंपनीला भंगार काढण्याची निविदा देण्यात आली. संबंधित कंपनीचे संचालक भंगार उचलण्यासाठी उदगीर येथे काही दिवसापूर्वी आले होते. त्यावेळी उदगीरच्या दुध डेअरी पुनरुज्जीवन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन शासकीय दूध योजना प्रकल्पाच्या ठिकाणी जोपर्यंत नवीन प्रकल्पाला शासन मंजुरी देत नाही तोपर्यंत येथील खीळाही उचलू नये असा स्पष्ट इशारा दिला होता. शासनाने उदगीरचा दूध भुकटी प्रकल्प भंगार मध्ये काढल्याच्या निषेधार्थ गुरुवारी दूध डेअरी पुनरुज्जीवन समितीच्या वतीने दूध डेअरीच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

या धरणे आंदोलनात आंदोलकांनी उदगीरची दूध डेअरी ही उदगीरकरांची अस्मिता असून या भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारी आहे. ही दुध डेअरी भंगारात न विकता शासनाने या दुध डेअरीसाठी निधी देऊन चालू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

     या आंदोलनात माजी आमदार शिवराज तोंडचीरकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, पंचायत समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजी मुळे, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजुरखान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष अजीम दायमी, ज्येष्ठ समाजसेवक रंगा राचुरे, युवा उद्योजक स्वप्नील जाधव, माजी नगरसेवक ऍड. दत्ताजी पाटील, गजानन सताळकर, महेबूब शेख, साईनाथ चिमेगावे, शिवसेनेचे अरुणा लेंडाने, सचिन साबणे, व्यंकट साबने, मनसेचे नेते संजय राठोड, बाजार समितीचे संचालक रवींद्र कोरे, आडत वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर पाटील, संदीप पाटील, ईश्वर समगे, प्रमोद पाटील, संतोष फुलारी, कांताबाई कलबुर्गे, छावाचे दत्ता पाटील, आनंद बुंदे, रामेश्वर पवार, शंकर मुक्कावार, रवी मुळे, साईनाथ चिमेगावे, अमित खंदारे, सूर्यभान चिखले, ऍड. रमाकांत चटनाळे, बबलू जाधव, विनोद सुडे, दिनेश देशमुख, अंकुश ताटपल्ले, नाना ढगे,  डॉ मंगेश हेरकर, लक्ष्मीबाई पांढरे,अजय शेटकार, व्यंकट काकरे, जशन डोळे, गिरीधर हुंडेकर यांच्यासह दूध डेअरी पुनरुज्जीवन समितीचे निमंत्रक आशिष पाटील राजूरकर, नरेश सोनवणे, एस. एस. पाटील, अजित शिंदे, ओम गांजुरे, संतोष कुलकर्णी, चंद्रकांत टेंगेटोल यांच्यासह शहरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी संघटना, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, नागरिक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रारंभी प्रास्ताविक मोतीलाल डोईजोडे यांनी केले, सूत्रसंचालन अहमद सरवर यांनी केले तर आभार प्रदर्शन कपिल शेटकार यांनी केले.

टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
उदगीरात श्री चे उत्साहात विसर्जन
इमेज