स्व. दयानंद चोपणे यांना पत्रकार संघाककडून अभिवादन..!!

 स्व. दयानंद चोपणे यांना पत्रकार संघाककडून अभिवादन..!!


सर्व क्षेत्रातील लोकांच्या मधला दुवा म्हणून चोपणे अण्णांची ओळख...!



निलंगा :- (प्रतिनिधी) १५ सप्टेंबर निलंगा तालुक्यातील जनतेसाठी धक्कादायक दिवस बनला निलंगा शहराचे भूमिपुत्र ज्यांनी आपल्या आयुष्यात राजकारणात असताना समाजकारणात जास्तीत जास्त भर देत शेतकरी शेतमजूर कष्टकरी पासून ते विविध पक्षांतील बलाढ्य नेत्यापर्यंत ज्यांच्या वाणी मुळे मनावर अधिराज्य गाजवता आलं अशे दयानंद आण्णा चोपणे यांना दि.१४ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. तातडीने त्यांना लातूर येथिल एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथून पुणे येथील रुबी हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना उजनी येथे पुन्हा त्यांना पाठीत व छातीत वेदना सुरू झाल्या.त्यानंतर त्यांना परत लातूरला त्याच खाजगी हॉस्पिटलमध्ये तातडीने अंबुल्स च्या माध्यमातून आणण्यात आले. मात्र नियतीला तो मान्यच नव्हतं. नियतीने घात केला आणि शेवटचा श्वास दयानंद आण्णा चोपणे यांनी घेतला. अखेरचा श्वास घेत दयानंद चोपणे आण्णा हे स्वर्गवासी झाले. त्यांच्या अकाली निधनाची वार्ता निलंगा शहरात व तालुक्यात पसरतातच सर्व क्षेत्रातील मान्यवराना धक्काच बसला. अनेक जण वार्ता ऐकताच स्तब्ध झाले काहीजणांना हे वार्ता चुकीचे आहे असे समज झाले. एक अजात शत्रू अनेकांसाठी दुवा तर अनेकांसाठी मार्गदर्शक ते होते.

      आज दि.१८ सप्टेंबर रोजी निलंगा शासकीय विश्राम गृह येथे पत्रकार संघाच्या वतीने स्व दयानंद व्यंकटराव चोपणे यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्व पत्रकार एकत्र जमले होते. अनेकांनी आप आपल्या जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत दुःख व्यक्त करत हळहळ व्यक्त केले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष राम काळगे, सचिव झटिंग मेहत्रे, पत्रकार गोविंद इंगळे, प्रा-अभिमन्यू पाखरसांगवे, जेष्ठ संपादक मोहन क्षीरसागर, माधव पिटले, गोविंद सुरवसे,विशाल हलकीकर,शिवाजी पारेकर,मिलिंद कांबळे,अस्लम झारेकर, साजिद पटेल, मुजीब सौदागर, अखिल देशमुख,यांच्या सह अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते..

प्रथमतः स्व दयानंद चोपणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

           निलंगा तालुक्यातील सामाजिक कार्याची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत देत सर्वंधर्मीयांच्या माध्यमातून महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक सामाजिक उपक्रमे राबवून निलंगा शहरांत हिंदू-मुस्लिम एक्येचे दर्शन घडवून आण्याचा कार्य हे दयानंद अण्णा चोपणे यांच्या माध्यमातून सातत्याने होत असल्याने त्यांना शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणारा सामाजिक कार्यात संघर्ष करून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणारा लढवय्या अशी सर्वपक्षीय सर्व सामाजिक संघटनेकडून उपाधी देण्यात आली होती..सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व क्षेत्रातील लोकांच्या मनातला आपला आण्णा बघता बघता स्वर्गवासी झालं. आजही वाटत नाही आण्णा स्वर्गवासी झाले आजही ते कुठंतरी आहेत असे सर्वांनी भावनिक शब्दात वर्णन केल्याने काही वेळ सर्व विश्राम गृह स्तब्ध झाले होते. या अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविक अस्लम झारेकर यांनी केले.दोन मिनिटं जागेवर उभा राहवून स्तब्ध राहवून स्व दयानंद आण्णा चोपणे यांना आदरांजली वाहण्यात आली..

टिप्पण्या
Popular posts
उदगीर मतदार संघात आजपासून स्वाभिमान संवाद यात्रा : अजित शिंदे
इमेज
उदगीरचे दोघे भाऊ गाणगापूरच्या नदीत बुडून ठार : सोबतचा एक मित्र जखमी
इमेज
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर माजी नगरसेवक रामेश्वर पवार यांचे उपोषण मागे
इमेज
निलंग्याचे निळकंठेश्वर मंदिर मराठवाड्याचे भूषण : ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज