निलंग्याचे निळकंठेश्वर मंदिर मराठवाड्याचे भूषण : ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर

 संभाजीराव धार्मिक परमार्थिक असल्यामुळे निळकंठेश्वर मंदिराचे काम चालू ,,,,,,

 काशीच्या जगद्गुरु च्या सूचनेनुसार मंदिर कामात बदल आवश्यक,,,,, 

निलंग्याचे निळकंठेश्वर मंदिर मराठवाड्याचे भूषण : ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर 





निलंगा; निलंगा येथील ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिर हे संपूर्ण मराठवाड्याचे भूषण आहे. या मंदिराचे काम पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शना खाली  होत आहे, राज्य करणारा नेता हा धार्मिक आणि परमार्थिक असला तरच मंदिरासारखे भव्य आणि दिव्य काम त्यांच्या हातून होते असे काम माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथील ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिराचे काम चालू केले असून यासाठी निधीची कसलीच कमतरता पडू देणार नाही असे अभिवचन दिले आहे, त्यामुळे या कामाला निलंगा नगरीतील जनतेने सहकार्य करावे असे प्रतिपादन पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले

दि.26 सप्टेंबर रोजी निलंगा येथील ग्रामदैवत निळकंटेश्वर मंदिरात शहरातील प्रमुख नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर बोलत होते प्रथमऔसेकर महाराज व माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंदिराची पाहणी केली व पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली 

यावेळी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, मधवाचार्य महाराज पिंपळे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,उपाध्यक्ष मनोज कोळे,पुरातत्व विभागाचे मुकुंद जाधव,भाजपा जिल्हाउपाध्यक्ष शेषेराव ममाळे ,प्रा ,दत्ता शाहीर,संजय हलगरकर ,वीरभद्र स्वामी,सुनिल पंढरीकर चेरमन दगडू सोळुंके,दत्ता मोहळकर, जयंत देशपांडे , शिवसेनेचे सुधीर पाटील माजी नगरसेवक पिंटू पाटील,शंकर भुरके ,शरद पेठकर, किशोर  लंगोट सुमित इनानी, अशोक शेटकार मंचक पांचाळ नीलकंठ पेठकर किशोर जाधव व शहरातील सर्व ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते,

पुढे बोलताना ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले पूर्वी सर्वच महादेव मंदिर हे दगडावर तयार झाले आहेत  आज या मंदिराचे जतन करण्याचे काम आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर करत आहेत. पण राज्यातील किती आमदाराचे लक्ष मंदिराकडे आहे असा सवाल करून म्हणाले हे काम आत्ताच होणे गरजेचे आहे. या मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे त्यामुळे धोंडा किती दिवस टिकेल हे समजेल मंदिराला क्रॅक गेले आहेत जो सिमेंटचा खांब दिला आहे त्याच्या सळया उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे या मंदिराचे संपूर्ण काम पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली व्हायला पाहिजे या मंदिरासाठी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जेवढा निधी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. आमदार साहेबांचे काही पुण्य आहे. त्यांच्या हातून हे महान काम होत आहे. आगामी काळात काशीचे जगद्गुरु यांना बोलावून त्यांनी सुचवल्याप्रमाणे बदल करून काम करावे लागेल कारण काशीचे जगद्गुरु केवळ  गुरुच नसून त्यांना मंदिराच्या बांधकामाची चांगली जाण आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराचे भव्य आणि दिव्य काम करण्यात येईल त्याबाबत निलंगा शहरातील जनतेने आपल्या काही सूचना असतील तर सांगाव्या  असे शेवटी ह भ प गहिनीनाथ महाराज  औसेकर यांनी उपस्थित नागरिकांना  विनंती केली

,,, काशीच्या जगतगुरूंचा निर्णय अंतिम ठेऊन काम करू ,,,,, माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर

,,,,,पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार काम करू मंदिर पिढ्यानपिढ्या टिकले पाहिजे

 निलंग्याचे ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिर हे शहरातील व या भागातील एक आराध्य दैवत आहे .या मंदिराचे काम पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली केले जाईल त्याचबरोबर काशीच्या जगद्गुरुंना या ठिकाणी बोलावून त्यांचा वेळ घेऊन त्यांच्यासमोर हा अहवाल ठेवून ते ज्याप्रमाणे काम करण्यास आपणाला सांगतील त्याप्रमाणे आपण काम करून घेऊ असे शेवटी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले

टिप्पण्या
Popular posts
उदगीर मतदार संघात आजपासून स्वाभिमान संवाद यात्रा : अजित शिंदे
इमेज
उदगीरचे दोघे भाऊ गाणगापूरच्या नदीत बुडून ठार : सोबतचा एक मित्र जखमी
इमेज
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर माजी नगरसेवक रामेश्वर पवार यांचे उपोषण मागे
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज