सौ. उषा कांबळे यांना उमेदवारी दिल्यास विजय निश्चित - मारुती पांडे
उदगीर : उदगीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची तुलनात्मक ताकद पाहिल्यास सर्वात प्रभावी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षच आहे. आणि या पक्षाच्या वतीने जर उदगीरच्या माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस सौ. उषा कांबळे यांना उमेदवारी दिल्यास निश्चितपणे विजय खेचून आणू शकतात असा विश्वास प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना काँग्रेस पक्षाचे जळकोट
तालुकाध्यक्ष मारुतीराव पांडे यांनी व्यक्त केला.
काँग्रेस पक्षाचे नेते माजी पालकमंत्री आ. अमित भैय्या देशमुख यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे राहावा, यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळेच उत्स्फूर्तपणे मतदारसंघातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. उदगीरच्या माजी नगराध्यक्ष उच्चविद्याविभूषित, विकासाची दृष्टी असलेल्या नेत्या सध्या मतदारसंघात गाठीभेटी करत असून जनतेतून त्यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येतो आहे. इतकेच नाही तर ज्या पद्धतीने त्यांनी उदगीर च्या नगराध्यक्ष असताना उदगीर शहराचा विकास केला, सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताचा विचार केला, तशाच पद्धतीने मतदार संघात विकास व्हावा. अशी अपेक्षा व्यक्त करत मतदारच त्यांना उमेदवार म्हणून पसंती देत आहेत. तसेच तुम्ही निवडणुकीला थांबा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. अशा पद्धतीचा विश्वास देत आहेत.
एका अर्थाने नागरिकांचीच पसंद काँग्रेसच्या उमेदवाराची असल्यामुळे विजयश्री काँग्रेसलाच मिळू शकेल. कारण सन 2001 मध्ये जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा म्हणून त्यांनी केलेले कार्य आजही लोकांच्या नजरेत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आपल्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह त्यांनी केलेले प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे उदगीर शहरात लोकसभेला साडेसात हजाराहून अधिक मताधिक्य प्राप्त झाले होते. नगरपालिकेमध्ये अत्यंत दर्जेदार काम करून त्यांनी शहराचा तर विकास केलाच केला, नगरपालिकेला अ दर्जा प्राप्त करून दिला. विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे जनता पाहतेय. तसेच गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील त्या सतत अग्रेसर असतात.
स्थानिक चा आमदार हवा, अशा पद्धतीची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. सध्या फक्त गुत्तेदारांचा आणि पुढार्यांचा विकास झाला आहे. सर्वसामान्य जनता आहे तिथेच आहे. अशा पद्धतीची चर्चा मतदारसंघात दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या परिसरातील आपल्या हक्काचा आमदार हवा, तर मग उषाताईला उमेदवारी मिळावी. यासाठी सर्व काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते आणि मित्र पक्षातील कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे प्रयत्न करत असल्याचेही मारुती पांडे यांनी सांगितले. उदगीर, जळकोटची जनता इतिहास घडवणार म्हणजे घडवणारच, अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या उषाताई कांबळे यांच्याकडे विकासाचे नियोजन असते, तसेच सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व त्यांनी यापूर्वी केलेले आहे, आणखीन करू शकतील, अशी क्षमता त्यांच्यामध्ये आहे. समाजासाठी सतत झटणाऱ्या परिवारातील बाई लेक म्हणून मतदार संघात त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या वडिलांनी स्वखर्चाने बौद्ध विहार बांधून समाज बांधवांसाठी आपली पाच एकर जमीन या बौद्ध विहारासाठी दान दिली आहे. हा दानशूरपणा आणि समाजाबद्दलची तळमळ विचारात घेऊन त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्या निश्चित विजय होतील. असा विश्वासही याप्रसंगी मारुतीराव पांडे यांनी व्यक्त केला आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा