इन्जी.विश्वजीत गायकवाड फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शासकीय योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवाव्यात - विश्वजीत गायकवाड

इन्जी.विश्वजीत गायकवाड फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शासकीय योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवाव्यात - विश्वजीत गायकवाड

उदगीर (प्रतिनिधी) : शासनाच्या वतीने वेळोवेळी सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून, अनेक लोक कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यामध्ये अनेक अडचणी येत असतात. काही जणांना त्या योजनांची माहितीच नसते, तर काहीजणांना त्या योजनेचे फॉर्म कसे भरायचे? याची माहिती नसते. तर कुठे कुठे दलालाच्या मार्फत लाभार्थ्यांची फसवणूक होत असते. हे सर्व टाळून सामाजिक जाण आणि भान ठेवत इंजी. विश्वजीत अनिलकुमार फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावात जाऊन प्रत्येक घराचा आणि घरातील प्रत्येकाचा सर्वे करून या योजना संदर्भात माहिती द्यावी. तसेच जे ज्या योजनेमध्ये लाभार्थी ठरू शकतात, त्या संदर्भात माहिती देऊन त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळावा, या दृष्टीने विशेष प्रयत्न करावेत. असे आवाहन इंजी. विश्वजीत गायकवाड यांनी केले आहे.
इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशन समाज हिताचा विचार करून कार्य करत आहे. महिला सबलीकरण, युवकांचे रोजगारांचे प्रश्न मिटवण्यासाठी शिबिरांच्या आयोजन, नोकरीसाठी मार्गदर्शन त्यासोबतच महिलांच्या सबलीकरणासाठी वेगवेगळे प्रशिक्षण शिबिर घेऊन महिलांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप असेल किंवा त्या शिलाई मशीनच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेला माल असेल तो खरेदी करून त्याची विक्रीची जबाबदारी पूर्णपणे फाउंडेशन घेत आहे. त्यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. अशाच पद्धतीने येणाऱ्या काळात तरुण आणि प्रौढांसाठी आपल्याला सकारात्मक काम करायचे आहे, हे लक्षात ठेवून फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकतीनेशी काम करावे. असेही आवाहन विश्वजीत गायकवाड यांनी केले आहे.

टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उदगीर शहराध्यक्षपदी सरोजा वारकरे
इमेज